23
Dec
ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांमध्ये शेती हा आजही रोजगार व उपजीविकेचा आधारस्तंभ आहे. महाराष्ट्रातील जव्हार येथील एका आदिवासी पाड्यातील शेतकरी चंद्रकांत सोन्या अंधेर एकेकाळी भारतभरातील हजारो शेतक-यांप्रमाणे हालाखीचे आयुष्य जगत होते. केवळ मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण आणि दोन एकरांची पर्जन्याधारित शेतीयोग्य जमीन इतकीच पुंजी गाठीशी असलेल्या चंद्रकांत यांचा उदरनिर्वाह लहरी पाऊस आणि पाण्याची सततची टंचाई यांवर विसंबून होता. चंद्रकांत यांची उर्वरित जमीन शेतीयोग्य नसल्याने त्यांना इतर हंगामांत कुटुंबाला मागे ठेवून आजुबाजूच्या शहरांत मोलमजुरीसाठी जाणे भाग होते – या कामात उत्पन्नाची हमी फार थोडी होती आणि प्रगतीचा कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नव्हता. टाटा मोटर्सचा इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम (IVDP) या दुर्गम पाड्यामध्ये आणि चंद्रकांत…
